जळगाव संदीप होले । जळगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी ३ ग्रामपंचायत बिनविरोध झाले असून उर्वरित ४० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज जळगाव तालुका प्रशासनातर्फे नूतन मराठा महाविद्यालयाल ईव्हीम मशिनचे सेंटींग व सिलिंगचे काम आज सकाळपासून सुरू आहे.
जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे वातावरण अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासन निवडणुकीला सज्ज झाली आहे. आज मंगळवार १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील नुतन मराठा महाविद्यालयातील सभागृहात तालुका प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांना निवडणुकपुर्व प्रशिक्षण देण्यात आले. यात मतदानाची सुरूवात कशी करावी आणि मतदान संपल्यावर कोणत्या गोष्टींकडे अधिक भर द्यावा याकडे भर देण्यात आला.
१५ जानेवारी रोजी मतदान असून तालुक्यातील एकुण १७० मतदान केंद्रे आहेत. यासाठी १७० बीयू आणि सीयू मशिनची पाहणी व तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर सेटींग करून सिलिंग करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी काही अडचणी निर्माण झाल्यास १० टक्के राखील मशिन प्रत्येक केंद्रावर उपलब्ध राहणार आहे. नुतन मराठा महाविद्यालयात सुरू आलेल्या ईव्हीएम मशिन सेटींग व सिंलींग करण्यासाठी संबंधित गावातील उमेदवार उपस्थित होते. त्याच्या समोर हे सिलिंग करण्यात येवून बॅरेगेटमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/3485742248214716