Home राजकीय निंबाळकर, दुधगावकर भाजपाच्या वाटेवर

निंबाळकर, दुधगावकर भाजपाच्या वाटेवर


ranjit naik 1

 

 

 

मुंबई (वृत्तसंस्था) माढा लोकसभा मतदारसंघात दबदबा असलेले काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपात प्रवेश करत आहेत. नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपाची माढ्यातील स्थिती मजबूत होणार असून काँग्रेसला फटका बसणार असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. नाईक निंबाळकर उद्या (सोमवारी) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

अहमदनगरमधील काँग्रेसचे सुजय विखे पाटील आणि उस्मानाबादमधील रणजितसिंह मोहिते पाटील, मुंबईतील प्रविण छेडा आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार यांच्यानंतर नाईक निंबाळकर यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. नाईक निंबाळकर यांचा सातारा जिल्ह्यातील माण, खटावस फलटण या माढा मतदार संघात येणाऱ्या तालुक्यांत मोठा प्रभाव आहे. याच कारणामुळे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माढा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळण्याची मोठी शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने माढ्यातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांचा संजय शिंदे यांच्याशी थेट मुकाबला होणार आहे. काही दिवसांपूर्वीच नाईक निंबाळकर यांना काँग्रेसने जिल्हाध्यक्ष पद देऊ केले होते. मात्र अंतर्गत वादामुळे नाईक निंबाळकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे बोलले जात आहे.
परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपात प्रवेश केल्यास परभणीत राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. समीर दुधगावकर यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound