जामनेर प्रतिनिधी । शहरातील युनियन बँकेत आलेल्या एका पिग्मी एजंटची पैश्याची बँग अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची प्रकार उघड झाला आहे. जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अर्जूनसिंग प्रेमसिंग चव्हाण (वय-२७) रा. कापुसवाडी ता. जामनेर हे पिग्मी एजंट आहे. ते युनिय बँक शाखा जामनेर साठी काम करतात. ५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते बँकेत आले. सोबत त्यांनी एका बँगमध्ये २३ हजार रूपयाची रोकड भरणा करण्यासाठी आणली होती. पैश्यांची स्लिप भरत असतांना टेबलावर ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबविली. पैसे भरणा करण्यासाठी जात असतांना टेबलावर ठेवलेली पैश्यांची बॅग दिसून आली नाही. शोधाशोध करून मिळून न आल्याने जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अर्जूनसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिलीप वाघमोडे करीत आहे.