नवी दिल्ली: वृत्तसंस्था । कोरोना रोखण्यासाठी आता नाकातून लस (नेझल स्प्रे) देण्यासाठीही संशोधन सुरू करण्यात येत आहे. इंजेक्शन घेण्याची गरज पडू नये म्हणून नाकातून स्प्रे देण्यासाठी संशोधक कामाला लागले आहेत. लवकरच ही नेझल व्हॅक्सीन देशवासियांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे
देशात अवघ्या आठ दिवसांत लसीकरण सुरू होणार आहे. त्यासाठी भारत सरकारने दोन इंजेक्शनच्या वापरासाठी परवानगीही दिली आहे.
भारत बायोटेक ही नेझल व्हॅक्सीन तयार करणार आहे. सध्या देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना मंजुरी देण्यात आली आहे. ही दोन्ही इंजेक्शने हातावर देण्यात येतात. मात्र, इंजेक्शन ऐवजी नाकातून स्प्रे सोडण्यावर संशोधकांनी संशोधन सुरू केलं आहे. नागपूरमध्ये त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेजची ट्रायल होणार आहे.
भारत बायोटेकने वॉशिंग्टन विद्यापीठाशी करार केला आहे. या नव्या नेझल व्हॅक्सिनचा केवळ एकच डोस घ्यावा लागणार आहे. संशोधनानुसार हा सर्वात चांगला पर्याय आहे, असं भारत बायोटेकचे डॉ. कृष्णा इल्ला यांनी सांगितलं. येत्या दोन आठवड्यात नेझल व्हॅक्सिनचा ट्रायल सुरू केला जाणार आहे. ही नेझल व्हॅक्सिन इंजेक्शनपेक्षाही अत्यंत परिणामकारक आहे. त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. बोयोटेक लवकरच या व्हॅक्सिनच्या ट्रायलसाठी डीसीजीआयकडे प्रस्ताव ठेवेल, असं डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितलं.
केवळ नागपूरच नव्हे तर भुवनेश्वर, पुणे आणि हैदराबादमध्येही या व्हॅक्सिनचे ट्रायल होणार आहे. या शहरांमधील १८ ते ६५ वयोगटातील एकूण ४०-४५ स्वंयसेवकांची निवड केली जाणार आहे. भारत बायोटेक अजूनही दोन इंट्रा नेझल व्हॅक्सिनवर काम करत आहे. दोन्ही व्हॅक्सिन अमेरिकेच्या आहेत.
. नाकातूनच व्हायरसचा फैलाव होण्याचा सर्वाधिक धोका असल्याने नाकातून देण्यात येणारी ही लस परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. कोणतीही लस नाकातून दिल्यास शरीरात इम्यून रिस्पॉन्स चांगला वाढतो. त्यामुळे नाकाद्वारे येणारे सर्व प्रकारचे इन्फेक्शन रोखले जातात नाकातून देण्यात येणाऱ्या लसीला मंजुरी मिळाल्यास ही लस कोरोनाच्या लढाईत गेम चेंजर ठरू शकते. इंजेक्शन टोचल्यावर केवळ मानवी शरीरातील यकृताचा खालचा भागच सुरक्षित होतो. परंतु, नाकातून लस सोडल्यास यकृताचा वरचा आणि खालचा दोन्ही भाग सुरक्षित होतो. सध्याच्या व्हॅक्सिनपेक्षा नाकातून देण्यात येणारी लस कमी धोकायदायक आहे. मानवी शरीरावर तिचा लवकर परिणाम दिसू शकतो.