Home Cities जामनेर जामनेर उपनगराध्यक्षपदी प्रा. शरद पाटील यांची बिनविरोध निवड

जामनेर उपनगराध्यक्षपदी प्रा. शरद पाटील यांची बिनविरोध निवड

0
62

जामनेर प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रा. शरद मोतीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

उपनगराध्यक्ष अनीस शेख बिसमील्ला यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे सोमवारी पालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अरूण शेवाळे होते. या सभेत प्रा. शरद पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली.

या सभेला नगराध्यक्षा साधना महाजन, मुख्याधिकारी राहुल पाटील, अनीस शेख, संध्या पाटील, उल्हास पाटील, आतीष झाल्टे, बाबुराव हिवराळे, ज्योतीबाई पाटील, शितल सोनवणे, मंगला माळी, किरण पोळ, प्रमोद वाघ,नाजीम शेख, रिजवान शेख, महेंद्र बाविस्कर, रतन गायकवाड, कैलास नरवाडे, फारूख मनीयार, लीना पाटील आदी नगरसेवक उपस्थित होते.

आमदार गिरीश महाजन यांच्याहस्ते उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील पाटील, राजधर पांढरे, सुहास पाटील, नाजीम शेख,उल्हास पाटील, कैलास नरवाडे, बाबुराव हिवराळे आदी पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound