शिरसगाव ग्रामपंचायत बिनविरोध; सदस्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार

चाळीसगाव प्रतिनिधी । शिरसगाव येथील जाणत्या मंडळींनी पुढाकार घेत स्वातंत्र्यानंतर प्रथमच ग्रामपंचायत बिनविरोध करून दाखवून इतिहास घडवला. निश्चितच हे इतर गावांसाठी देखील प्रेरणादायी असून कुठल्याही गावाच्या विकासासाठी एकजूट महत्वाची असते ती एकजूट शिरसगाव ग्रामस्थांनी दाखवल्याने गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिले.

ते चाळीसगाव येथे अंत्योदय जनसेवा कार्यालयात शिरसगाव ग्रामपंचायतीच्या नूतन बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करत होते. यावेळी पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजयुमो उपाध्यक्ष कपिल पाटील, शिरसगाव गावाचे माजी सरपंच तथा जेष्ठ विधीज्ञ ऍड. साहेबराव पाटील, शेतकरी संघटनेचे आर के पाटील, माजी सरपंच दिगंबर देवरे, माजी विकासो चेअरमन गोरखअप्पा चव्हाण, माजी विकासो चेअरमन विजय केशव चव्हाण, सुरेश वामन चव्हाण यांच्यासह पुढील बिनविरोध निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

वार्ड क्रमांक 1 

सौ.सुनिता सागर पाटील

सौ.शितल अनिल धनगर

विजय केशवराव चव्हाण

क्रमांक 2

अभिराज भीमराव चव्हाण

अशोक रामराव चव्हाण

सौ.विमलबाई भालचंद्र पाटील

वार्ड क्रमांक तीन

सौ.शर्मिला सुरेश चव्हाण

भीमराव साहेबराव चव्हाण

व वार्ड क्रमांक चार

सौ.अनिता दिगंबर देवरे

सौ.मीराबाई संजय बिराडे

सौ.तायाबाई उत्तम निकम

व प्रमोद चव्हाण, शेषराव चव्हाण, अमोल चव्हाण, संदीप चव्हाण, युवराज आबा,  साहेबराव लालजी, प्रकाश उत्तम सोनवणे, ईश्वर आप्पा, यशवंत भास्कर चव्हाण, गोरख बापु, आनंद बच्छाव, आबा चव्हाण, गणेश चव्हाण, वाल्मीक निकम, दिनकर अण्णा, महेश वाडेकर, बापु चव्हाण , एस.एम.चव्हाण, नामदेव महादु चव्हाण, पिराजी गायकवाड, आनंदा जिभाऊ, दिलीप पाटील, बबडु नाना, महेंद्र सोनवणे सुनील निकम, जुलाल बापु, सुदाम देवचंद चव्हाण, साहेबराव शेनपडु चव्हाण संजय चव्हाण, मुसा दादा, चेतन चव्हाण, महेंद्र सोनवणे, रामकृष्ण चव्हाण, लड्डु बाबा, सागर पाटील, बापुराव देवरे, मुरलीधर देवरे, अनिल गायकवाड, पुरुषोत्तम चव्हाण, दशरथ चव्हाण, मधुकर पाटील, आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधी यांनी गावगाड्याच्या राजकारणात पडायला नको मात्र ज्या गावात चांगल्या कामासाठी गावातील ग्रामस्थ एकत्र येत असतील तेथे चांगल्या माणसांच्या पाठीमागे उभे राहणे देखील लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी असते तसेच गावातील एखादी वाईट प्रवृत्तीच्या विरोधात गाव असेल तर त्याला गाडण्यासाठी देखील मी गावाच्या सोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जेष्ठ विधिज्ञ साहेबराव पाटील यांनी सांगितले की, गावाची निवडणूक बिनविरोध करा यासाठी आमदार मंगेशदादा यांचा सुरुवातीपासून आग्रह होता. त्यासाठी माझ्यासह गावातील आजी माजी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ मंडळी यांच्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विषय मांडला असता त्याला सर्व गावाने प्रतिसाद दिला. त्यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले तर आर के पाटील यांनी मनोगत सांगितले की जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे गावाच्या विकासावर परिणाम होतो. त्याला तिलांजली देत गाव एकत्र आल्याने आता आमदारांनी देखील विकासकामांसाठी जास्तीतजास्त सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content