Home Cities अमळनेर अमळनेर येथे शिवसेनेतर्फे शिवाजी महाराज जयंती साजरी

अमळनेर येथे शिवसेनेतर्फे शिवाजी महाराज जयंती साजरी


 

 

 

5356fe15 6404 476c bb80 2584c836e26a

अमळनेर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे रूपांतर सुराज्यामध्ये केले होते. महाराजांच्या राजदरबारात सर्व जाती धर्माच्या लोकांना नोकरी व मान सन्मान मिळत असे. त्यांचे कार्य देशाला दिशा देणारे आहे, असे प्रतीपादण शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे यांनी आज येथे केले.

आज शिवसेनेच्या प्रथेनुसार तिथीप्रमाणे फाल्गुन कृ 3 म्हणजेच जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना महाराष्ट्रभर साजरी करते, आज सकाळी येथील न.प.च्या शिवाजी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख डॉ. पिंगळे, तालुका प्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख प्रताप शिंपी, यांनी पुष्पमाला अर्पित करून अभिवादन केले. सदर प्रसंगी माजी शहरप्रमुख संजय पाटील, नितीन निळे, वैद्यकीय सेनेचे डॉ. शशिकांत सोनार, व्यापारी सेनेचे पिंकू पटेल, विद्यार्थी सेनेचे माजी शहरप्रमुख रामचंद्र परब, ग्राहक कक्षाचे विजय शुक्ल, शाखाप्रमुख विजय नवल पाटील, मिलिंद निळे यांच्यासह असंख्य युवा शिवसैनिक उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound