Home Uncategorized रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

0
52


 

जळगाव,प्रतिनिधी । प्रथम महिला शिक्षिका, समाजसुधारिका व कवियत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त दाणा बाजार येथील दत्त मंदिराजवळ जळगाव येथील रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चित्रा मालपाणी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करण्यात आली. कार्यक्रमाला रिध्दी जान्हवी फाऊंडेशनचे चंदन पाटील, किरण कोलते, सतीश दायमा, पद्मावती राणा, कीर्ती राणा, निशा पाटील, संगीता दायमा, आदी सभासद हजर होते. कार्यक्रमाची रूपरेषा कीर्ती राणा यांनी तर आभार चंदन पाटील यांनी मानले.


Protected Content

Play sound