Home Uncategorized शहादा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

शहादा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के


 

नंदुरबार : वृटत्तसंस्था । शहादा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. अनेक गावात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल एवढी आहे. शहादा तालुक्यातील सावळदा भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची नोंद झाली आहे.

शहरासह तालुक्यातील वडाळी, मंदाना, कहाटूळ आदी मंडळातील गावांसह अन्य काही गावात आज दुपारी दीडच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्‍के जाणवले. सावळदा (ता.शहादा) येथील भूकंपमापन केंद्रात ३.२ रिस्टर स्केलची नोंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेश राज्यातील एका गावात हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. प्रस्तुत भूकंपाचे केंद्र शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असल्याचे समजते. या धक्क्यामुळे तालुक्यात कुठेही जीवित व वित्तहानी झाली नसल्याचे वृत्त आहे


Protected Content

Play sound