Home Cities रावेर रावेर लोकसभा मतदारसंघात 308 ठिकाणी चुनाव पाठशाला

रावेर लोकसभा मतदारसंघात 308 ठिकाणी चुनाव पाठशाला


 

जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर विविध वयोगटातील नागरिकांचा सहभाग असलेली चुनाव पाठशाला कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रावेर लोकसभा मतदारसंघातील रावेर व यावल तालुक्यात 308 मतदान केंद्रांमध्ये चुनाव पाठशाला गठित करण्यात आल्या आहेत. या चुनाव पाठशाळेत शाळाबाह्य विद्यार्थी, भविष्यका‍लीन मतदार, 18-19 वर्षे वयोगटातील नवीन मतदार, महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आदींचा समावेश आहे. या पाठशाळेचे बी. एल. ओ. हे नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत राहतील.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर व यावल तालुक्यात आज सर्व मतदान केंद्रावर या चुनाव पाठशालांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला, शाळाबाह्य मुले, जेष्ठ नागरिकांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी निवडणुकीत झालेले बदल, निवडणुकांचे महत्व, व्ही. व्ही. पॅट ईव्हीएमची माहिती, मतदानाचे महत्व या संदर्भात गावामधील एका संयोजकाच्या आणि मतदान मित्राच्या साहाय्याने सहभाग नोंदविला, असे रावेर विधानसभा क्षेत्राचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound