Home Cities जळगाव पु.ना. गाडगीळ दालनाचा पहिला वर्धापनदिन

पु.ना. गाडगीळ दालनाचा पहिला वर्धापनदिन

0
56

जळगाव प्रतिनिधी । आभूषणांच्या क्षेत्रातील ख्यातप्राप्त असणार्‍या पु.ना. गाडगीळ दालनाच्या जळगाव शाखेला आज एक वर्ष होत असून या कालखंडात ही पेढी जिल्ह्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

दागिने आणि आभूषणांच्या क्षेत्रातील अत्यंत विश्‍वासार्ह नाव म्हणजे पु.ना. गाडगीळ होय. २२ मार्च २०१८ रोजी रिंग रोडवरील प्रशस्त जागेत हे दालन सुरू झाला असून आज याला एक वर्ष पूर्ण होत आहे. पु.ना. गाडगीळ हा ज्वेलरीतील अतिशय विख्यात असा ब्रँड आहे. १८३२ साली स्थापन झालेल्या पेढीची सध्या सहावी पिढी कार्यरत आहे. मूळ कार्यालय पुणे येथे असणार्‍या पीएनजीचा आता बहुराज्यीय विस्तार झाला आहे. तीन राज्यांमधील २९ शाखांच्या माध्यमातून लक्षावधी ग्राहकांना सेवा दिली जात आहे.

जळगाव येथील शाखेतही गत वर्षभरात हा सेवेचा वारसा जाणीवपूर्वक जोपासण्यात आला आहे. येथे ग्राहकांना भावणारे विविध दागिने उपलब्ध आहेत. यामध्ये वर्षभरातील विविध सण व उत्सवांमध्ये ग्राहकांसाठी नवनवीन व्हरायटीज सादर करण्यात येत आहेत. यात वेळोवेळी ग्राहकांना आकर्षक ऑफर्सदेखील देण्यात येतात. याच्या जोडीला पीएनजीमध्ये कला दालनाच्या माध्यमातून रसिक जळगावकरांना विविध कलावंतांच्या कलाकृतीचा आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे महिन्यातून दोनदा विविध थीम्सवर आधारित वेगवेगळ्या कलावंतांची प्रदर्शने होत असतात. याला अतिशय उदंड असा प्रतिसाद लाभला असून आगामी सहा महिन्यांसाठी येथील प्रदर्शनाच्या सर्व तारखा आधीच बुक करण्यात आल्यात ही बाब विशेष होय.

जळगावसह जिल्ह्यातील नागरिकांनी आम्हाला एका वर्षात अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला असून भविष्यातही हे प्रेम कायम राहणार असल्याची ग्वाही पु.ना. गाडगीळ दालनाच्या व्यवस्थापनातर्फे देण्यात आली आहे.

संपर्क : पु.ना. गाडगीळ अँड सन्स

गंगाराम नगर, टागोर नगरजवळ, रिंग रोड
जळगाव

०२५७-२२१४५४४

गुगल मॅप्सवर पहा अचूक लोकेशन


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound