Home क्राईम दिनकर नगरात तरूणावर जीवघेणा हल्ला ; दोघांवर गुन्हा

दिनकर नगरात तरूणावर जीवघेणा हल्ला ; दोघांवर गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । शहरातील दिनकर नगरात मावस भावाला मारल्याचा जाब विचारणाऱ्या तरूणाला दोघांनी बेदम मारहाण करून डोक्यात लोखंडी पट्टी मारून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संदीप विष्णू सोळंखे (वय-२०) रा. दिनकर नगर, आसोदा रोड हे आपल्या आईवडीलांसह राहतो. संदीपचा मावस भाऊ शैलेश समाधान कोळी याला गल्लीतील अतूल सुधाकर सपकाळे आणि प्रशांत उर्फ भाय (पुर्ण नाव माहिती नाही) यांनी मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी संदीप सोळंखे हा २७ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गेला असता अतूल आणि प्रशांत यांना राग आल्याने दोघांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. अतूलने संदीपच्या डोक्यात दगड हाणला आणि लोखंडी पट्टी डोक्यात टाकल्याने संदीप गंभीर जखमी झाला. संदीपच्या मावसभावांनी सोडवासोडव केली. संदीप सोळंखे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अतूल आणि प्रशांत यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सलिम पिंजारी करीत आहे.


Protected Content

Play sound