संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचा ११ वा समाधी दिवस सोहळा साजरा (व्हिडिओ )

 

रावेर, प्रतिनिधी । अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे व श्री वृंदावन धाम पाल आश्रमाचे संस्थापक सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या २५ डिसेंबर रोजी ११ वा समाधी दिवस सोहळा साजरा करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सालाबादाप्रमाने तीन दिवसीय साधना शिबिर ऐवजी एका दिवसाचे पादुका पूजन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पाल वृंदावन धाम आश्रमाचे विद्यमान गादिपती श्रधेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या सानिध्यात करण्यात आला.
या महोत्सवात फैजपुर सतपंथ महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्धन हरिजी महाराज, तसेच खंडोबा वाड़ी फैजपुर महामंडलेश्वर श्री पुरुषोत्तम दासजी महाराज, स्वामी श्री मनोहर दासजी महाराज, कुसुंबा येथील महंत श्री भरत दास जी महाराज, चाळीसगावचे स्वामी विशुद्धानंद शास्री जी महाराज, सतवाड़ा मध्यप्रदेश येथील स्वामी संतोष दासजी महाराज व पूज्य बापूजीचे कृपापात्र ब्रम्हचारी श्री सत्य चैतन्य , श्री दिव्य चैतन्य, श्री श्याम चैतन्य, श्री महेश चैतन्य, श्री शांति चैतन्य, श्री शिव चैतन्य, श्री राधे चैतन्य, श्री ब्रज चैतन्य, श्री नवनीत चैतन्य, श्री केशव चैतन्य, श्री सर्व चैतन्य, श्री गुलाब चैतन्य, श्री हरीश चैतन्य, श्री शोभाराम चैतन्य, श्री ऋषि चैतन्य, आदि संत महंत व महामंडलेश्वर यांच्या उपस्थितित सोहळा पार पडला.

रावेर न्यायाधीश रविंद्र राठोड, आमदार शिरीष चौधरी, रावेर पोलीस निरीक्षक श्री. वाकोडे, सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटिल यानी पूज्य बापूजींच्या समाधीचे दर्शन घेतले.
शुक्रवार २५ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजेला श्री हरिधाम मंदिर स्थित परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी समाधि मंदिरात पदस्थ श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या हस्ते पादुका पूजन करण्यात आले. त्यानंतर गुरुदीक्षा, व आलेल्या मान्यवराचे श्रद्धावचन तसेच सत्संग सोशल डिस्टन्सिंगच्या मध्यमात करण्यात आले.

सुरुवातीला गोपाल चैतन्य जी महाराज यांनी चैतन्य साधक परिवाराला गुरु निष्ठा व भवसिंधु पार होण्याचे मार्ग दाखविले. त्यामध्ये श्रद्धेय महाराजांनी पूज्य सद्गुरु बापूजीची ११ वी पुण्यतिथि (समाधी सोहळा) असून त्यांची आठवण आपल्या हृदयात करून आपल्या जीवनात जे बदल घडविले त्याबद्दल आभार व्यक्त करून परमेश्वर रूपी त्या सद्गुरुचे स्मरण करणे हेच पुण्यस्मरण होय. तसेच शिष्याला सुद्धा आपली योग्यता व तन मन धन गुरु प्रती अर्पण केले पाहिजे.

आमदार शिरीष चौधरी यांनी गुरु हेच गुरुला निर्माण करतात, जसे पूज्य बापूजीनी संत गोपाल चैतन्य बाबाजी यांना निर्माण केले. गुरुची सेवा ही शिष्याची जबाबदारी असते. या कोरोना काळात तुम्ही साधक कोरे होऊन निघाले असून तरी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरून काळजी घेणे गरजेचे आहे.

फैजपुर खंडोबा वाडी महामंडलेश्वर स्वामी पुरुषोत्तम दास जी महाराज यांनी गुरूंचे महत्व पटवून दिले. कुसुंबा येथील महंत स्वामी भरत दास जी महाराज यांनी आजचा दिवस म्हणजे त्रिवेणी संगम असून आज पूज्य बापूजी यांचे समाधी दिवस तसेच मोक्षदा एकादशी, आणि गीता जयंती अश्या पावन पर्वात चैतन्य साधक परिवार डुबकी लावत असून भाग्यशाली आहात.

सतपंत फैजपुर महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्धन हरि जी महाराज यांनी संतांची जबाबदारी आहे की साधकाला आतून व बाहेरुन पवित्र तसेच जीवन जगताना जेवढे जीवन परमेश्वरानी दिले आहेत तेवढे दिवस नित्य आनंदी राहून जगणे. सत्संगने विवेक जागृत होऊन जो मनुष्य भगवंताच्या शरणात येतो त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन श्री दिव्य चैतन्य जी महाराज यांनी केले. महाआरती होऊन साधकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

https://www.facebook.com/508992935887325/videos/153697899529044

 

Protected Content