पुढील खुर्ची न मिळाल्याने प्रज्ञा ठाकूर संतापल्या

 

भोपाळ वृत्तसंस्था । येथील भाजपच्या एका कार्यक्रमात खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना पुढील बाजूस नव्हे तर मागे खुर्ची मिळाल्याने त्यांनी संतप्त होऊन कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याची घटना घडली आहे.

भोपाळमध्ये भाजपच्या कार्यालयाच्या उदघाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्‍वर शर्मा आणि खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर उपस्थित होत्या. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आपल्याला मागच्या रांगेत खुर्ची देण्यात आल्याचं पाहून साध्वी प्रज्ञा नाराज झाल्या.

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी यावेळी स्थानिक नेत्यांना बोलून दाखवलं. स्थानिक भाजप नेत्यांकडून यावेळी प्रज्ञा सिंह यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला गेला. पण संतापलेल्या साध्वी प्रज्ञा या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराजसिंह येण्याआधीच तिथून निघून गेल्या.

Protected Content