नशिराबाद प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील महेंद्र हॉटेल जवळ जळगावकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. दुचाकीवरील दोन्ही जखमी झाले आहे. नशीराबाद पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, राजेश भागीराथ चावरिया (वय-४८) रा. वाल्मिक नगर, भुसावळ हे कामाच्या निमित्ताने त्यांचे मित्र सुनिल घसीटा पवार यांच्याहस दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएस १०३१) ने २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगावला येत होते. तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील हॉटेल महिंद्रा जवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरधार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून दोघांचे पाया फ्रॅक्चर झाले आहे. अपघात होताच चालक ट्रक सोडून पळ काढला आहे. याप्रकरणी राजेश चावरिया यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय राजेंद्र साळुंखे करीत आहे.