Home Cities जळगाव शिवाजीनगरात एलईडी बसविण्यास महापौरांच्या हस्ते सुरुवात !

शिवाजीनगरात एलईडी बसविण्यास महापौरांच्या हस्ते सुरुवात !

0
108

जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर परिसरात एलईडी बसविण्याचा शुभारंभ आज शुक्रवारी 25 डिसेंबर रोजी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. इंद्रप्रस्थ नगरजवळील बुद्धविहार येथे पूजा करून आणि नारळ वाढवून कामाला सुरुवात करण्यात आली. 

शहरात ठिकठिकाणी एलईडी बसविण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, सभागृह नेते ललित कोल्हे, विद्युत सभापती गायत्री राणे, नगरसेवक रुकसाना पांडे, प्रिया जोहरे, सरिता नेरकर, ऍड.दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, मंगेश जोहरे आदी उपस्थित होते.

जळगाव शहरात एलईडी बसविण्यात येणार असून कामाचा शुभारंभ मोहाडी रस्त्यापासून करण्यात आला. मोहाडी रोड परिसराचे काम पूर्ण होताच संपूर्ण परिसर उजळून निघाला असून शुक्रवारी शिवाजीनगर परिसराचा शुभारंभ करण्यात आला.

 

 

 

 


Protected Content

Play sound