Home राजकीय शिवसेना पक्षाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करा – मोहन मसूरकर

शिवसेना पक्षाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करा – मोहन मसूरकर

0
103

रावेर प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचा संदेश घेऊन मी आलो आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना विचारधारेचाच सरपंच झाला पाहीजे, गाव पातळीवर जास्तीत-जास्त शिवसेना पक्ष बळकट करा, राज्यात शिवसेनेची सत्ता असून जनतेचे कामे करून पक्षाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करण्याचे अवाहन रावेर विधानसभा संपर्क प्रमुख मोहन मसूरकर यांनी केले. 

येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे रावेर तालुक्यात होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात महत्वाची बैठक संपन्न झाली यावेळी श्री मसूरकर बोलत होते. त्यांनी शिवसैनिकाना मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की पक्षात कोणतीच गट-तट न करता एकसाथ पक्षवाढीसाठी काम करावे रावेरला आपले सहकारी पक्ष कॉग्रेस पक्षाचे आमदार असून त्यांच्या कडून देखील आपले कामे करून घेण्याचे आदेश शिवसैनिक यांना दिले यावेळी शिवसेना पक्षाचे नविन पदाधिका-यांच्या नियुक्ता करण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती 

शिवसेना उप जिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन तालुका युवासेना अधिकारी प्रविण पंडीत, रावेर शहर युवासेना अधिकारी राकेश घोळफळे, शिवसेना शहराध्यक्ष बंटी महाजन, रविंद्र पवार, माजी शिवसेना शहराध्यक्ष संतोष महाजन, रविंद्र महाजन, तुकाराम कोळी, सुधाकर महाजन, डॉ.  दिपक पाटील, कुणाल बागरे, सुरेश लोणारी, मिलिंद पाटील, पि आर पाटील, रविंद्र सोनवणे, विश्वनाथ कोळी, मुकेश महाजन, सजंय कोळी, बाबुराव पाटील, गणेश पाटील, रविंद्र चौधरी आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 


Protected Content

Play sound