Home क्राईम जळगावात चोरट्यांचा उच्छाद ! दोन दिवसात मोबाईल हिसकावण्याची चौथी घटना

जळगावात चोरट्यांचा उच्छाद ! दोन दिवसात मोबाईल हिसकावण्याची चौथी घटना

0
110


 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या भागात एका पॅटर्ननुसार पादचाऱ्या हातातून मोबाईल लांबविल्याचा प्रकार वाढला आहे. शहरातील आकाशवाणी ते काव्यरत्नावली चौकात अज्ञात वाहनावर ट्रीपल सीटवरून येवून हातातील मोबाईल पुन्हा लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, कैलाश गुलाबदार भाटीया (वय-५३) रा. प्लॉट नं. २३, गणेश नगर, जिल्हापेठ हे १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आकाशवाणी कडून काव्यरत्नावली चौकाकडे पायी जाण्यासाठी निघाले असता. मागून दुचाकीवर अज्ञात तिघे जण येवून कैलास भाटीया यांच्या हातातील ११ हजार रूपये किंमतीचा मोबाईल बळजबरी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. आरडाओरड केली तोपर्यंत तिघे ट्रिपल सीटने पळ काढला होता. याप्रकरणी रामांनदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. कैलास भाटीया यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिपक बिरारी करीत आहे.


Protected Content

Play sound