राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी ।राष्ट्रवादी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात मंगळवार २२ डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रवेश केला.

भाजपाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस हर्षवर्धन खैरनार, शहरउपाध्यक्ष तेजस रडे, शहरसरचिटणीस साकीब शेख, अजय ओझा तसेच राष्ट्रवादी मधील कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.  त्यांना भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात प्रवेश देण्यात आला. याप्रसंगी फटके फोडून व पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीची विचार धारा व केंद्रातील मोदी सरकारचे काम आवडल्याने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याची भावना महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी  बोलतांना व्यक्त केली. व्यक्त केली. तर हर्षवर्धन खैरनार यांनी आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून अधिक जोमाने काम करू असे स्पष्ट केले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/845239336316780

 

Protected Content