जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी रोडवरील रहिवाशी असलेले व्यापारी यांची बनावट वेबसाईटद्वोर मशीन घेण्याच्या नावाखाली ४ लाख ३० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात आयटी ॲक्टनुसार सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, सरोज राजेंद्र भालोदे (वय-५८) रा. कमल हॉस्पिटल, सिंधी कॉलनी रोड जळगाव यांचे शहरात होलसेल वस्तूचे विक्रीचे दुकान आहे. दुकानासाठी त्यांना काही वेळा ऑनलाईन पेमेंटद्वारे वस्तूंची खरेदी व विक्री करतात. ६ जुलै २०२० ते १७ जुलै २०२० दरम्यान त्यांची ऑनलाईनच्या माध्यमातून एका अनोळखी व्यक्तीची ओळख झाली. आपल्या सम व्यवसायाशी निगडीत असल्याने समोरील अनोळखी व्यक्तीने बनावट कंपनीचे नाव सांगून कंपनीतून बोलत असल्याचे भासवून व्हाटस्ॲपवर कंपनीचा लोगो आणि नाव तसेच बनावट कागदपत्रे खरे म्हणून बनावट वेबसाईट दाखविली. त्यानुसार सरोज भालोदे यांनी ओबीएम नावाच्या दोन मशीन खरेदीसाठी ४ लाख ३० हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. पैसे देवूनही अद्यापपर्यंत कोणताही परतावा आणि मशिनही पाठविले नाही. आपणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सराजे भालोदे यांनी जळगाव सायबर पोलीस स्टेशनला जावून रितसर फिर्याद दिली. सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.