रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील वडगाव येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कांडवेल शिवारातील शेतात मोकळ्या जागेवर १२ वर्षीय मुलाला पैश्यांचे आमिष दाखावत संशयित आरोपी गबा उर्फ प्रेमलाल धुडकू भालेराव (वय-२३) रा. कोळोदे ता. रावेर याने १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेताच्या आजूबाजूला कोणीही नसतांना अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार शेतमालक यांच्या लक्षात आल्याने निंभोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रेमलाल भालेराव यांच्या विरोधात निभोंरा पोलीस ठाण्यात बालसंरक्षण कायदा व लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि स्वप्निल उनवणे करीत आहे.