Home Cities अमळनेर ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलमध्ये दिक्षांत समारंभ

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलमध्ये दिक्षांत समारंभ


amalner 2

अमळनेर प्रतिनिधी। अमळनेर येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे प्रि प्रायमरी विभागातील सिनियर के.जी च्या विद्यार्थ्यांचा दिक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सिनीअर के.जी. प्रायमरी विभागातून पहिली प्रायमरी विभागात यशस्वी पदार्पणासाठी कॉन्होकेशन कॅप व प्रमाणपत्र देऊन प्राचार्य विकास चौधरी व प्रशासन अधिकारी अमोल माळी यांच्या हस्ते गौरवण्यात आले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत हा अनोखा सोहळा त्यांना खास आकर्षण ठरत होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्यात आत्मविश्र्वास निर्माण करणारा होता.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेत नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.सुत्रसंचालन भारती ढोले यांनी केले तर आभार आशा पवार यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound