Home Cities जळगाव भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ममता बनर्जी सरकारचा निषेध (व्हिडिओ)

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ममता बनर्जी सरकारचा निषेध (व्हिडिओ)

0
30

 

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गाड्यांवर प. बंगाल येथे ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक केली, या आत्मघातकी भ्याड कृत्याचा भव्य निषेध आमदार तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भा.ज.यु.मोर्चातर्फे करण्यात आला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गाड्यांवर प. बंगाल येथे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ममता बनर्जी सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, सचिन पानपाटील, महिला आघाडी अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, नगरसेवक राजु मराठे तसेच युवा मोर्चा जिल्हा महानगर सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, महेश पाटील, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, विक्की सोनार, राहुल मिस्त्री, राहुल लोखंडे, रियाज शेख, जयेश ठाकुर, चिटणीस प्रतिक शेठ, सागर जाधव, प्रसिध्दी प्रमुख गौरव पाटील, कार्यालय मंत्री भुषण पाटील, सोशल मिडिया प्रमुख भूषण जाधव, मंडळ अध्यक्ष महेश लाठी, जयंत चव्हाण, अबोली पाटील, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, महिला जिल्हा सरचिटणीस रेखा वर्मा, सरोज पाठक ,शोभा कुलकर्णी , निला चौधरी , सविता बोरसे , पुजा चौधरी , तृप्ती पाटील, शालू जाधव , जगताळे ताई , राहुल वाघ, गणेश माळी , भास्कर जुनागडे तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/717330505882619

 


Protected Content

Play sound