Home Cities अमळनेर अमळनेरातील समर्थ नगरातून दुचाकी लांबविली

अमळनेरातील समर्थ नगरातून दुचाकी लांबविली

two wheelar thift

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील समर्थ नगरातून घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील समर्थ नगरात राहणारे प्रदीप अर्जून रामराजे (वय-५७) रा. समर्थ नगर, कृउबा समोर अमळनेर हे खासगी नोकरीला आहे. कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे (एमएच १८ एएफ ९९७०) क्रमांकाची दुचाकी आहे. कामावर जाण्यासाठी याच दुचाकीचा उपयोग करतात. ३ ऑक्टोंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान त्यांनी घरासमोर पार्किंगला दुचाकी लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरासमोर लावलेली दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी मंगळवारी उशीरा प्रदीप रामराजे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कैलास शिंदे करीत आहे.


Protected Content

Play sound