एरंडोल, प्रतिनिधी । येथील धरणगाव चौफुलीवर आज काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी काळे तीन कायदे तत्काळ रद्द करण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी जवळपास अर्धातास दोघं बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यां सोबत शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी एरंडोल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष संजय भदाने,एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्र प्रमुख इम्रान सैयद,सेवादल तालुकाध्यक्ष संजय कलाल,कसोदा शहराध्यक्ष सुरेश पवार,पारोळा तालुका कार्याध्यक्ष भिमराज शिंदे,पारोळा शहराध्यक्ष भिकाजी अहिरे,पारोळा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील,उपाध्यक्ष विनायक पाटील,विठ्ठल पाटील,रामकृष्ण पाटील,हिंमत पाटील,शेख सांडू,प्रकाश ठाकुर, भीकन पाटील,सुदर्शन महाजन,आनंद सैंदांशिव,काशिनाथ मिस्तरी,बबन वंजारी,डॉ.प्रशांत पाटील,बी.वाय.पाटील,प्रकाश बाविस्कर,धोंडू क्षीरसागर,सुरेश पवार,मदन भावसार, डॉ.फरहान बोहरी,ज्ञानेश्वर गायकवाड,आबा पाटील,डॉ.राजेंद्र चौधरी,मुरलीधर पाटील,प्रकाश पाटील, डॉ. डी.एस.महाजन,धर्मराज चौधरी,हिरामण महाजन,सुपडू पाटील,रफिक पिंजारी,सुनिल पाटील,शिवाजी कोळी, विष्णु कोळी,जहिरब्बास पिंजारी,गोकुळ चौधरी,एम.आर.शेख आदी पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी एरंडोल तालुका शिवसेना,शहर शिवसेना,युवा सेना,महिला आघाडी तर्फे या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकावर महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदाताई पाटील,माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश महाजन,उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर,विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील,तालुका प्रमुख वासुदेव पाटील,तालुका संघटक राजेंद्र चौधरी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हिंमत पाटील,माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर अमाले,माजी पंचायत समिती सभापती दिलीप रोकडे,उपसभापती अनिल महाजन,उप तालुका प्रमुख राजेंद्र चौधरी,संजय पाटील,मा.सभापती शालिग्राम गायकवाड,जी.प.सदस्य नाना भाऊ महाजन,जी.प.सदस्य वैशाली गायकवाड,प.सदस्य मोहन सोनवणे,विवेक पाटील, गट प्रमुख रविंद्र जाधव,देशमुख राठोड,राजु धनगर,शहर प्रमुख कुणाल महाजन,शहर संघटक नितीन बिर्ला,तालुका प्रमुख युवा सेना घनशाम पाटील,शहर प्रमुख युवा सेना अतुल महाजन,माजी संचालक वी.का.सो.राजेंद्र महाजन,आनंदा चौधरी,चिंतामण पाटील,सुभाष मराठे,सुनिल चौधरी,राजेंद्र ठाकुर,परेश बिर्ला,गणेश मराठे,अमोल भावसार,सुनिल मराठे, चंदु जोहरी,कुणाल पाटील,कृष्णा ओतारी,पद्माकर मराठे,योगेश महाजन,अतुल मराठे,पंकज चौधरी,छोटू मराठे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.