Home Cities जळगाव संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण

संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण


जळगाव प्रतिनिधी । शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयात अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण झाले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासकिय नियमानुसार महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतिथनिमित्त वेगवेगळ उपक्रम राबविले जातात. आज जिल्हा रूग्णालय प्रमुख तथा वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते सकाळी ११ वाजता प्रतिमा पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती सांगण्यात आली. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी जी.जी. दिघावकर, प्रशासकीय अधिकारी आर. यु. शिरसाठ, स्त्री रोगतज्ञ डॉ.एस.पी. चव्हाण, कर्मचारी रवींद्र मुळे, दिलीप मोराणकर, नरेंद्र वाघ आदी कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound