चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वाघडू येथे व्यायामशाळेचे भूमिपूजन खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून वाघडू येथे मंजुर झालेल्या व्यायाम शाळेचे भूमिपूजन आज करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य तथा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, माजी तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला मुरलीधर पाटील, प्रविण पाटील, बबनराव पाटील, संजय भाऊसाहेब पाटील, शेखर पाटील, वैजीनाथ पाटील ,रमेश पाटील, सुदाम पाटील, गंभीर पाटील ,राजाराम पाटील, भागवत पाटील (पोलीस पाटील) साहेबराव पाटील,अशोक पाटील ,जगदिश पाटील, प्रताप पाटील, सुनिल पवार ग्रामसेवक,संजय आधार पाटील,पराग पाटील आनंदा पाटील अंकुश पाटील,संजय संतोश पाटील आदि ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले. यावेळी गावातील जेष्ठ मान्यवर नागरिक उपस्थित होते. पोपट तात्या भोळे, के बी दादा साळुंखे, संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक, सूत्रसंचलन आबा पाटील यांनी केले.
येथील नागद रोड वरील वाघडू येथे आज सकाळी अकरा वाजता सुसज्ज व्यायाम शाळेचे भूमिपूजन खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.