Home राजकीय प्रियंका पिचकारीची बाजारात धूम

प्रियंका पिचकारीची बाजारात धूम


priyanka gandhi pichkari

नाशिक (वृत्तसंस्था) यंदाच्या होळीच्या बाजारावर निवडणुकीचा रंग पाहायला मिळतोय. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ‘प्रियांका वॉटर टँक’ नावाची पिचकारी दाखल झाली आहे. या पिचकारीला ग्राहकांची मागणी वाढली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी, योगी आदित्यानाथ, मायावती यांच्या नावाच्यासुद्धा पिचकारी बाजारात पाहायला मिळत आहे. मात्र यंदा प्रियांकाच वरचढ ठरत आहे.

नाशिकच्या स्थानिक बाजारात प्रियांका गांधीच्या पिचकारीला मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘प्रियंका वॉटर टँक’ची किंमत 250 रुपये आहे. मागील निवडणुकीत मोदी पिचकारी चांगलीच लोकप्रिय ठरली होती. यंदा मात्र प्रियंका पिचकारीची धूम पाहायला मिळतेय. तर प्रियांका वॉटर टँकलाही नागरिकांची चांगलीच मागणी पाहायला मिळतेय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound