Home राजकीय …तर जयंत पाटील भाजपमध्ये असते : नारायण राणेंचा दावा

…तर जयंत पाटील भाजपमध्ये असते : नारायण राणेंचा दावा

0
39


रत्नागिरी । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले नसते तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते असा दावा आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत केला. याचे पुरावे आपल्याकडे असून ते पाटील यांच्या इस्लामपुरात जाऊन उघड करण्याची घोषणा त्यांनी केली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या टिकेला त्यांनी जोरदार उत्तर दिले आहे. रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत राणे म्हणाले की, आज महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. 

पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ बोलताना जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्याला राणे यांनी आज प्रत्युतर दिल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound