Home Cities रावेर नगीनदास इंगळे यांना समता परिषदेचा गुणवंत पुरस्कार घोषीत

नगीनदास इंगळे यांना समता परिषदेचा गुणवंत पुरस्कार घोषीत

0
124

रावेर प्रतिनिधी । महाराष्ट्र समता शिक्षक परिषद शाखा जळगाव मार्फत दिला जाणारा या वर्षीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार तालुक्यातील खिरवड येथिल विकास माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक नगीनदास दयाराम इंगळे यांना जाहीर झाला आहे.

नगीनदास इंगळे हे कॉस्ट्रॅईब माध्यमिक शिक्षक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सामाजिक समता मंच रावेरचे सचिव व भारतीय बौध्द महासभा रावेर तालुका सरचिटणीस अशा विविध पदावरुन, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याने, त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र समता शिक्षक परिषद शाखा जळगाव मार्फत दिला जाणारा जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. ३ जानेवारी सावित्रीमाई फुले जयंती दिनी जळगाव येथे होणार्‍या समता परिषदेच्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार सपत्नीक दिला जाणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


Protected Content

Play sound