Home Cities जळगाव धर्मरथ फाउंडेशनच्या मतदार नोंदणी शिबारास उत्तम प्रतिसाद (व्हिडिओ)

धर्मरथ फाउंडेशनच्या मतदार नोंदणी शिबारास उत्तम प्रतिसाद (व्हिडिओ)

0
28

 

जळगाव, प्रतिनिधी । निवडणूक आयोग व धर्मरथ फाउंडेशन यांच्यामार्फत रविवार २९ नोव्हेंबर रोजी नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती,मयत मतदार कमी करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

निवडणूक आयोग यांच्या दिशादर्शन अनुसार व निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबिरामध्ये जवळपास ३५० च्यावरती लोकांनी नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, पत्ता बदल असे सर्व काम या ठिकाणी करण्यात आले. या शिबिराच्या वेळेस लोकांना त्रास होऊ नये यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून विनायक पाटील यांनी झेरॉक्स मशीन उपलब्ध करून दिले. शिबिराच्या समारोपावेळी धर्मरथ फाउंडेशन यांच्या वतीने विनायक पाटील यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी कामकाज पहिले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1289945518005934/

 


Protected Content

Play sound