Home Cities जळगाव पो.नि.विनायक लोकरे यांची पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नती

पो.नि.विनायक लोकरे यांची पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नती

0
149

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनायक पांडुरंग लोकरे यांची पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नती झाली असून त्यांना नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत पदस्थापना देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या गृहविभागाने २६ नोव्हेंबर रोजी या विषयी परिपत्रक कांढण्यात आले आहे. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक किंवा सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या पदावर पदोन्नती देण्याकरिता सन २०१६ – १७ आणि २०१९ – २० च्या निवड सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या निशस्त्र पोलीस निरीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. यात  सन २०१६ – १७ मध्ये एक तर २०१९ – २० तीन अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली आहे. यात २०१९ – २० मध्ये विनायक लोकरे यांची पदोन्नतीचे आदेश गृहविभागाने काढले आहेत. सदरील पदोन्नती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या आधींन राहून करण्यात आल्या आहेत.


Protected Content

Play sound