भुसावळ : प्रतिनिधी । वरणगाव शहर व भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दि. २७ नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती शाखा वरणगाव येथे आगामी नगरपरिषद निवडणुक व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे.
ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्रभैया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख मार्गदर्शक माजी मंत्री एकनाथराव खडसे, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष अरविंद मनकरी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे.
या बैठकीत तालुक्यातील ग्रामपंचायत , वरणगाव नगरपरिषद निवडणूक बाबत चर्चा आणि पक्षाची रणनीती ठरविण्यात येणार आहे.
सोशल डिस्टन्स ठेऊन सर्व प्रकारची खबरदारी घेऊन बैठक होणार आहे. उपस्थितीचे आवाहन भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे, अल्पसंख्याक विभागाचे पप्पू जकातदार, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मनोज कोलते यांनी केले आहे.