संपूर्ण राज्याकरिता एकात्मिक बांधकाम नियमावलीस मंजूरी

 

पाचोरा, प्रतिनीधी ।राज्यातील संपूर्ण बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस मंजुरी देण्याचा निर्णय नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून याबाबतचे निर्देश शासनाकडून आज प्राप्त झाले आहेत.या निर्णयाचे स्वागत करून क्रेडाई महाराष्ट्र संघटनेतर्फे राज्य सरकारचे हार्दिक अभिनंद व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

पाचोरा येथील क्रेडाई संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय कुमावत यांनी प्रेसनोट देउन शासनाचे आभार व्यक्त केले. यात नमुद करण्यात आले आहे की, गेले ३ ते ४ वर्षापासून बांधकाम क्षेत्रात आलेली मरगळ दूर होऊन व्यवसाय चांगल्या प्रमाणात भरभराठीस येईल अशी अपेक्षा क्रेडाई महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष राजीव परीख व सचिव सुनिल कोतवाल यांनी व्यक्त केली.

संपुर्ण राज्यासाठी एकच विकास नियंत्रण नियमावली राहणार असल्याने देश-विदेशातील गुंतवणूकदारांसाठी ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ ही संकल्पना साध्य होणार आहे. राज्यभरातील स्वतःसाठी घर बांधकाम करणारे, हॉटेल, हॉस्पिटल सारखे वाणिज्य प्रकल्प, परवडणारी घरांचे प्रकल्प, रहिवासी रेखांकन विकास तसेच सर्व बांधकाम व्यावसाईक, आर्किटेक्ट, बांधकाम सल्लागार यांना या सुलभ नियमावलीचा मोठा फायदा होणार आहे. मुंबई शहर, एम.आय.डी.सी, नैना क्षेत्र, पोर्ट ट्रस्ट, हिल स्टेशन नगरपरिषद व इको सेन्सिटिव्ह झोन वगळता संपूर्ण राज्यभर ही नियमावली लागू होणार आहे. या नियमावलीकरिता क्रेडाई महाराष्ट्र शासनाकडे गेले १८ महिने सातत्याने पाठपुरावा करीत होती, त्यामुळे मंजुरीकरीता बराच काळ प्रलंबित असलेली, शहराच्या एकात्मीक विकासासाठी अत्यंत उपयोगी व बांधकाम उपयोगी सर्वच महत्वाच्या बाबींचा अंतर्भाव असलेली नियमावली मंजूर झालेबद्दल क्रेडाई पाचोरा चॅप्टरचे अध्यक्ष संजय कुमावत, मानद सचिव मनिष भोसले व कार्यकारिणी सदस्यांनी समाधान व्यक्त करून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

Protected Content