Home Cities जळगाव पाचोऱ्यात भाजपातर्फे विज बिलांची होळी

पाचोऱ्यात भाजपातर्फे विज बिलांची होळी


 

पाचोरा, प्रतिनिधी ! पाचोरा येथे भाजपाचे शहर शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोरोना व्हायरस काळात आलेल्या जादा लाईट बिलाची होळी करण्यात आली.

राज्यातील महाआघाडीच्या सरकार विरोधात घोषणाबाजी देत वाढीव विज बिलांची आलेली रक्कम कमी करा, निवडणुकीत दिलेला वचननामा पूर्ण करा, अशा घोषणाही देण्यात आल्या, विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले.

यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष रमेश वाणी, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतिलाल जैन, माजी तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, अॅड. गोरक्ष पाटील, भरत पाटील, राजेश संचेती, भावेश पटेल, दिपक माने, समाधान मुळे, सुधीर पुणेकर, संजय पाटील, विरेंद्र चौधरी, सनी जगताप, संजय पाटील, नितीन पाटील, सचिन देशमुख, निलेश पाटील, विलास पाटील सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound