Home Cities जळगाव उर्वरित कामे करण्यासाठी पुन्हा परत येणार – सुरेशदादा जैन ( व्हिडीओ )

उर्वरित कामे करण्यासाठी पुन्हा परत येणार – सुरेशदादा जैन ( व्हिडीओ )

0
36

जळगाव प्रतिनिधी । आपल्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देणार्‍या चाहत्यांचे आभार व्यक्त करत माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी उर्वरित काही कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा परत येणार असल्याची ग्वाही संदेशाच्या माध्यमातून दिली आहे.

काल माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन यांचा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी समाजमाध्यमांमधून त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या. याला सुरेशदादा जैन यांनी एका व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या शुभेच्छांनी मी भारावून गेलो आहे. काल सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्या चारही फोनवर शुभेच्छा सुरू होत्या. काही उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा परत येणार असल्याचे त्यांनी या संदेशात आवर्जून नमूद केले आहे. यामुळे ते राजकारणात पुन्हा सक्रीय होणार का ? याबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले आहे.

खालील व्हिडीओत पहा सुरेशदादा जैन नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/682086802695160


Protected Content

Play sound