Home Cities जळगाव जळगावात मुली, महिलांसाठी मोफत ब्युटी सेमिनारचे आयोजन

जळगावात मुली, महिलांसाठी मोफत ब्युटी सेमिनारचे आयोजन

0
29

 

जळगाव, प्रतिनिधी । श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानकडून स्मार्ट लूक ब्युटी वर्ल्डमध्ये मुली ,गृहिणींसाठी मोफत ब्युटी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानतर्फे आयोजित सेमिनार प्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ सदस्य प्रमुख पाहुणे सुरजी दायमा यांनी महिलांना स्वयंरोजगार विषयी मार्गदर्शन केले. तसेच श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष किरण सोनवणे यांनी मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहून कसा व्यवसाय करावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे यांनी कार्यक्रमाचे समारोप केला. सेमिनारसाठी स्मार्ट ब्युटी वर्ल्डच्या संस्थापिका अनिता दसरे व अन्याय अत्याचार निर्मूलन समिती जिल्हा संघटक हर्षाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले۔


Protected Content

Play sound