Home क्राईम जळगावात ट्रक्टरच्या दोन बॅटरींची चोरी; शनिपेठ पोलीसात गुन्हा

जळगावात ट्रक्टरच्या दोन बॅटरींची चोरी; शनिपेठ पोलीसात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । शहरातील काळे पेट्रोलपंप परिसरातील दोन ट्रक्टरच्या साडेआठ हजार रूपये किंमतीच्या इलेक्ट्रीक बॅटरी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. बुधवारी रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, राजेंद्र प्रल्हाद काळे (वय-४८) रा. गांधी नगर जिल्हापेठ यांचा पेट्रोल पंपचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे (एमएच १९ पी ३५११) आणि (एमएच १९ पी ६७५) क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर आहेत. काळे पेट्रोल पंपाच्या खळ्यात त्यांनी १७ नोव्हेंबर रोजी दोन्ही ट्रक्टर पार्किंगला लावले होते. सकाळी ८ ते दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन्ही ट्रक्टरच्या ७ हजार ५०० रूपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्या. राजेंद्र काळे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत देशमुख करीत आहे.


Protected Content

Play sound