रावेर, प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात हेक्टरी १० हजार तर बहूवार्षिक पीकासाठी हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाईचे सानुग्रह अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
नुकसान भरपाईचे सानुग्रह अनुदान आजपर्यंत ६० लाख रुपये अनुदान १९०० शेतक-यांना वर्ग करण्यात आले आहेत. तर इतर शेतक-यांना अनुदान वर्ग करण्यासाठी पुरवठा अधिकारी हर्षल पाटील वेगाने काम करत आहे. शेतक-यांनी थोडा धिर धरावा लवकरच पूर्ण अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तालुक्याला सुमारे चार हजार शेतक-यांसाठी १ कोटी १३ लाख ३२ हजार ५८८ रूपयांचा निधी तहसील कार्यालयात प्राप्त झाला आहे. त्यापैकी आता पर्यंत एक हजार नऊशे शेतक-यांचे साठ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे.