अफगाणिस्तानने पाकचे १५० अतिरेकी मारले

 

काबूल: वृत्तसंस्था । अफगाणिस्तान सरकारने दहशतवाद्यांविरोधात एका मोठ्या कारवाईत दीडशे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अफगाणिस्तान सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्यानंतर अलीकडच्या काळात केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.

घातक कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हेलमंद आणि कंदाहारमध्ये एक महिन्यांपासून मोठी कारवाई सुरू आहे. दहशतवाद विरोधी अभियानामध्ये जवळपास ७० तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती अफगाणिस्तानच्या अंतर्गत राजकीय मंत्रालयाने दिली. तालिबान्यांच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी अफगाणी सुरक्षादलांनी हे खास ऑपरेशन राबवले,

. ‘आम्ही जेव्हा मोहीम सुरू केली त्यावेळी २० दहशतवादी कमांडर वेगवेगळ्या ठिकाणचे होते. सुमारे ४५ ते १०० दहशतवाद्यांचे ते नेतृत्व करीत होते. कंदाहारमध्ये जवळपास ४० तालिबानी दहशतवादी कमांडर मारले गेले आहेत’, असे अफगाण सरकारच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या मुलाखतीत नमूद करण्यात आले आहे.

 

. या कारवाईत हेलमंदमध्ये मारले गेलेले दहा कमांडर उरुजगा, कंदाहार आणि गजनीमधून होते. कमीतकमी दीडशे पाकिस्तानी दहशतवादी मारले गेल्याचेही सरकारने अधिकृतपणे स्पष्ट केले. आतापर्यंत ६५ मृतदेहांना डुरंड लाइनद्वारे पाठविण्यता आले आहेत. ३५ मृतदेह फराह, ५४ हेलमंद आणि प्रत्येकी १३ मृतदेह जाबुल आणि उरुजगान प्रांतात पाठविण्यात आले आहेत.

अफगाणीस्तानात राबविण्यात आलेल्या या ऑपरेशनचे नेतृत्त्व चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मोहम्मद यासिन यांनी केले. आमची मोहीम अद्यापही सुरू आहे. तालिबानच्या हल्ल्यात मागच्या २५ दिवसांत सुमारे सव्वाशे नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. आतापर्यंत तीनशेवर लोक या हल्ल्यांमध्ये जखमी झाले होते. आम्ही २८९ लोकांवर उपचार करीत आहोत असे अफगाणीस्तानकडून सांगण्यात आले.
दरम्यान सामान्य नागरिकांवर कोणतेही हल्ले करण्यात आलेले नाही, असे तालीबानने स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पाकिस्तानचे सुमारे साडेसहा हजार दहशतवादी अफगाणिस्तानात सक्रिय असल्याचा ठपका ठेवण्यता आला होता. यातील बहुतांश दहशतवाद्यांचा संबंध तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेशी असल्याचे नमूद करण्यात आले होते. अमेरिकेने अफगाणीस्तानला हे दहशवादी घातक असल्याचा इशारा दिला होता. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तान आणि अफगाणीस्तान यांनी संयुक्तपणे पावले उचलावी, असा आग्रहदेखील अमेरिकेने धरला होता.

Protected Content