Home क्राईम नवर्‍याने उशीने दाबून केला कांचनचा खून- माहेरच्यांचा आरोप

नवर्‍याने उशीने दाबून केला कांचनचा खून- माहेरच्यांचा आरोप

0
69


जळगाव जितेंद्र कोतवाल । शहरातील कांचननगर भागातील कांचन वाणी-शेटे या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तिच्या पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. दरम्यान, तिच्या तोंडावर उशीने दाबून कांचनचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी असणार्‍या प्रमोद शेटे या तरूणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिचा मृत्यू झाल्यानंतर प्रमोद शेटे याने आज सकाळी रेल्वे खाली आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आज रूळांवर आढळून आला.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोद शेटे याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले. आपली पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले. प्रारंभी कांचन हिने विषय प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तथापि, तिच्या माहेरची मंडळी जिल्हा रूग्णालयात आल्यानंतर त्यांनी कांचनने विष प्राशन केले नसून प्रमोद शेटे याने तिच्या तोंडावर उशी दाबून धरल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. बाजूलाच उशी पडलेली असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली.

दरम्यान, कांचन हिच्या कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयात आल्यानंतर हंबरडा फोडल्याने वातावरण भावविवश झाल्याचे दिसून आले. तर या प्रकरणी आता शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

खालील व्हिडीओत पहा मयत कांचन हिच्या माहेरचे लोक नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3466344726788873


Protected Content

Play sound