Home क्राईम तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
158


 

 

 

जळगाव : प्रतिनिधी । कांचन नगरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने रात्री घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल राजेंद्र जाधव (वय 21, रा- कांचन नगर) हा आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. सोमवारी भाऊबीजेच्या दिवशी रात्री साडेदहा वाजता आई-वडील जेवण करून घराबाहेरील ओट्यावर बसले असतांना राहुलने मागच्या घरात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. नेमके आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून आईवडील यांनी हंबरडा फोडला

. मयत राहुल हा एका रगडा दुकानावर कामाला होता, आईवडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्याचा पश्चात आई वडील आणि विवाहित बहीण आहे. शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे


Protected Content

Play sound