फटाक्यांनी भाजून खासदाराच्या नातीचा मृत्यू

प्रयागराज : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मतदारसंघाच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा फटाके फोडताना भाजून दुर्दैवी मृत्यू झालाय. उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. तिला उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आलं होतं.

रीता बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके पेटवत होती. इतर मुलांसोबत तीदेखील घराच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेली होती. दिवाळीला फटाके पेटवताना चिमुरडीनं फॅन्सी ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. आणि ती गंभीररित्या भाजली.

सुरुवातीला इतर मुलांनी आरडा-ओरडा केला परंतु, लहान मुलं आपांपसात खेळत आहेत असं समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. घरातील सदस्य मुलांकडे पोहचेपर्यंत मुलगी गंभीररित्या भाजली होती. . मंगळवारी सकाळीच मुलीला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, उपचारा दरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला.

 

Protected Content