Home Cities जामनेर पोषण अभियान निमित्त सायकल रॅली काढून जनजागृती

पोषण अभियान निमित्त सायकल रॅली काढून जनजागृती


जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यात ८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त तालुक्यातील नांद्रा प्र लो येथे अंगणवाडीच्या वतीने सायकल रॅली काढून नुकतेच जनजागृती अभियान राबविण्यात आले.

पोषण सप्ताह निमित्त बचत गटांना स्वच्छतेविषयी महत्त्व सागून आहाराविषयी माहिती देण्यात आली. तसेच अन्नसुरक्षा,अन्नभेसळ इत्यादींबाबत प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. किशोरवयीन मुलींना अनिमिया ओळखणे,आहाराद्वारे अनिमिया दूर करणे,स्वच्छता इत्यादी बाबत करण्यात मार्गदर्शन आले. परसबाग करून आपल्याला लागणारा भाजीपाला हानैसर्गिकरित्या रासायनिक खतांचा वापर न करता कसा मिळवावा. तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा रासायनिक शेतीपेक्षा नैसर्गिक शेती कशी करावी व नैसर्गिक शेतीचे महत्त्व यावेळी गावकऱ्यांना सांगितले. यावेळी डॉ. आधार पाटील, नीता गांगुर्डे अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्चना धामोरे, सेविका अनिता पाटील, मीना पाटील,सुनिता घोरपडे उपस्थित होते. बालविकास प्रकल्प अधिकारी ईश्वर गोयर व पी.एम. परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली सदर सप्ताह राबविला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound