जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १२ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
कोरोना रिपोर्टनुसार अमळनेर तालुक्यात १, चाळीसगाव ७ आणि मुक्ताईनगर १ असे एकुण ९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर उर्वरित १२ तालुके निरंक आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ५७२ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले त्यापैकी १ लाख ३९ हजार ९१३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.