जळगाव, प्रतिनिधी | २३ व्या स्टूडेंट मॅनेजमेट गेमची जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात राष्ट्रीय स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. आयमा व चाणक्य यांच्या सयुंक्त विद्यमाने प्रगत शहरामध्ये यास्पर्धेचे आयोजन केले जायचे. परंतु, यावेळी प्रथमच शहरातील रायसोनी महाविद्यालयाला या स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली असल्याची माहिती रायसोनी इंस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्टूडेंट मॅनेजमेट गेम या राष्ट्रीय स्पर्धेची प्राथमिक फेरी २२,२३,२४ ऑक्टोबरला महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३ ते ४ विद्यार्थ्याच्या टीमला सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत चाणक्य या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांना वास्तविक जगातील बिजनेसच्या परिस्थिती दिल्या जातील. त्या परिस्थितीमध्ये स्पर्धकांना बिजनेस रिलेटेड निर्णय घ्यावे लागतील. यातून त्यांना अनुभातून शिक्षण मिळणार आहे. पहिल्यांदाच जळगाव शहरात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेच्या नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे असे प्रा. डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. या प्राथमिक फेरीतील विजेत्यांची तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे ता. ३० नोव्हेंबर रोजी अंतिम फेरी होणार आहे. या ठिकाणी प्रथम विजयी ठरलेल्या विद्यार्थी स्पर्धकांना चॅम्पियन ट्रॉफी व हिरो मोटारसायकल मिळणार आहे. तसेच द्वितीय विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना रनरअप ट्रॉफी आणि रोख रक्कम ३०,००० रुपये तर तृतीय ठरलेल्या स्पर्धकांना रनरअप ट्रॉफी व रोख रक्कम २०,००० रुपयाचे पारितोषिक घोषित करण्यात आ.ले आहे. यास्पर्धेच्या अधिक माहितोसाठी रायसोनी महाविद्यालयातील प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे यांच्या ९८५०६२८३०५, ९५०३०६७११७ य क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रा. डॉ. अग्रवाल यांनी केले आहे.