मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । मुंबईत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम उपनगरात असलेल्या अंधेरीत एका ८९ वर्षीय वृद्धानं पत्नी आणि मुलीची हत्या केली. वृद्धाची मुलगी मानसिकरित्या अस्वस्थ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार पुरुषोत्तम सिंह अंधोक नावाच्या व्यक्तीनं ८१ वर्षीय पत्नी कमलजीत सिंह आणि ५५ वर्षांची मुलीची रविवारी रात्री हत्या केली. पुरुषोत्तम सिंह शेर-ए-पंजाब वसाहतीत वास्तव्यास आहेत. दोघींची हत्या केल्यानंतर त्यानं फ्लॅट आतून बंद केला. संपूर्ण रात्र त्यानं दोघांच्या मृतदेहांसोबत काढली. सकाळी आपल्या मोठ्या मुलीला कॉल करून त्यानं झाला प्रकार सांगितला.
मोठी मुलगी सकाळी घरी पोहोचली. मात्रल गंधोकनं दरवाजा उघडण्यास नकार दिला. आधी पोलिसांना फोन कर असं त्यानं मुलीला सांगितलं. फ्लॅटमधील एका खोलीत गंधोकची पत्नी आणि मानसिक रुग्ण असलेल्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
पत्नी आणि मुलगी अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त होत्या. त्यांचे हाल बघवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या हत्या केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणात पुढील तपास सुरू केला आहे.