वरणगाव प्रतिनिधी । काेरोनाशी दोन हात करणाऱ्या रणरागिनींना मदतीचा हात म्हणून भुसावळातील ओम सिध्दगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव नेत्रालयातर्फे रणरागिनींना आरोग्य रक्षणासाठी ‘संपूर्ण उलन हात मोजे’ तर मानसिक आरोग्य सशक्त राहण्याची ‘श्री रामरक्षा’ भेट म्हणून देण्यात आले, याआधी पण वासुदेव नेत्रालयातर्फे पोलीस स्टेशन बांधव, पोस्ट कर्मचारी बांधव यांना उलन मोजे, वाटप केले असून अधूनमधून पोलिसांचे वाहने, काड्या आदी नियमितपणे निर्जंतुकीकरण करत आहेत.
वरणगाव शहरातील करोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये सुधारणा होतांना दिसत येत नाही. त्यामुळेच शहरातील खाजगी डॉक्टर रणांगणात उतरून स्वतः सर्वेक्षणात सहभागी झाले आहेत. खाजगी डॉक्टर घरासमोर आल्याने नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शहरात 19 मे रोजी पहिला करोना बाधित रुग्ण आढळून आला. यानंतर आज संख्या वाढत जाऊन ३५वर पोहचली आहे. त्यात उपचार होउन बरं होण्याऱ्यांची संख्या २३ तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या मोहिमेत एका कंटेंटमेन्ट झोन मध्ये ४ खाजगी डॉक्टर,शासकीय डॉक्टर, पालिका कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश आहे.
करोनाशी दोन हात करणाऱ्या रणरागिनींची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून त्याच भावनेतून सदर उपक्रम राबविला आहे. संपूर्ण वरणगाव नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पण करोनाशी दोन हात करणाऱ्या सर्व “आरोग्य दूत’ साठी मदतीचा हात पुढे करावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा की समाजात आपल्या आरोग्याची काळजी घेणारे आहेत, अशी माहिती सिध्दगुरू नित्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितू पाटील यांनी कळविले आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी वरणगाव शहरातील आशा गटप्रवर्तक कल्पना भंगाळे, संगीता माळी, प्रीती चौधरी, आशा वर्कर भारती निकम, सरला गावंडे, निर्मला चौधरी, अनिता जोहरे, आशा जोहरे, नंदा चौधरी उषा चौधरी, मीना चौधरी, संजीवनी चौधरी, सुनीता श्रीखंडे, विनया सारवन, कविता चौधरी, सरला बोंडे, वत्सला रामबोले, भरती सुरवाडे, परिचारिका एल.लोखंडे, सी.जी.भोळे, एमपीडब्ल्यू डी.पी.माळी,एम.ए. माळी असे जवळपास ४० रणरागिणीना वाटप करण्यात आली. यावेळी कपिल राणे, मझर शेख, आमीन शेख, दीपक फेगडे, राहुल कोचुरे वासुदेव नेत्रालतील सहकारी वर्ग उपस्थित होता. यासर्व उपक्रमासाठी निर्मल साई हॉटेल,वरणगाव चे संचालक सचिनभाऊ माळी यांचे सहकार्य लाभले.