यावल ( प्रतिनिधी) येथील बसस्थानकावर पोलीसांनी हजारो रुपयांचा गुटका पकडल्याची माहिती आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, आज (दि.१२ फेब्रवारी) दुपारी पोलीसांनी गुप्त माहीतीच्या आधारे १२ .३० वाजेच्या सुमारास बुरहानपुर-शिर्डी बसमधून (क्रमांक एम.एच.२० बि.एल. ५१९१) अचानक तपासणी करून दोन बॉक्स गुटखा जप्त केला आहे. त्याची अंदाजीत किंमत ७२ हजार रूपये आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असुन, बुरहाणपुर हे मध्य प्रदेश या राज्यात मध्ये येत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासुन अवैध मार्गाने लाखो रुपयांचा गुटखा बस आणी इतर वाहनांव्दारे आपल्या राज्यात आणला जात असुन त्याची तालुक्यात विविध ठिकाणी सर्रास विक्री केली जात आहे. सर्वात अधिक एस.टी. बसव्दारे लाखो रुपयांचा गुटख्याची वाहतुक केली जात असुन यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा सहभाग तर नाही ना ? असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर शोधणे व वारंवार बेवारस गुटखा आढळून येणे संशयास्पद आहे. अनेकवेळा पोलीसांनी गुप्त माहीतीच्या आधारे एसटीमधुन गुटका जप्त केला आहे, मात्र तो बेवारस असल्याचे समोर आले आहे.