धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नाने एका ७० वर्षीय वृध्द आजीला जीवनदान मिळाले आहे. धरणगाव येथील रहिवासी वत्सलाबाई पाटील (वय 70) असे जीवनदान मिळालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, वत्सलाबाई पाटील यांना काही दिवसांपूर्वी हृदयाचा त्रास जाणवत होता. श्वास घेण्यास अधिकचा त्रास होत असल्याने त्यांनी एरंडोल येथील डॉ बोहरी यांचा कडे हृदयाची तपासणी केली. तपासणीत त्यांच्या ह्दयला मोठे छिद्र असल्याचे समजले. त्यांची हृदयाची (AVR ) व्हाॅल रिप्लेसमेट शस्त्रक्रिया लवकर करने गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लाखो रुपये लागतील आणि विशेष म्हणजे रुग्णाचे वय जास्त असल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी होईल का नाही? हा पण मोठा प्रश्न होता. वत्सलाबाई यांची मुलगी माया पवार हे धरणगाव शहरातील डॉ अतुल शिंदे यांना भेटून सर्व सागितले व मदत मागितली. शेवटी डॉ शिंदे यांनी मायाताई यांना तुम्ही एरंडोल चे विक्की खोकरेना भेटा ते तुम्हाला पुर्ण मदत करतील असे सागितले. मायाताई यांनी विक्की खोकरे यांची भेट घेतली आणि सर्व हकीगत सांगितली. विक्की खोकरे यांनी लगेचच एसएमबीटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी फोनवर चर्चा करत तत्काळ शस्त्रक्रिया करून द्यावे, असा हट्ट धरला. कारण मोठमोठ्या हॉस्पिटलला शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन तिन महिने वेटींग करावे लागते. परंतु खोकरे यांनी वत्सलाबाई पाटील यांचे कागदपत्रे जमा करत त्यांना महात्मा फुले जिवनदायी योजनेचा लाभ मिळवून दिला. तसेच पाटील यांचा सोबत स्वता जाऊन हॉस्पिटल मध्ये तात्काळ अॅडमिट करुन घेतले. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर डॉ.विद्युत कुमार सिन्हा यांनी काही दिवसानंतर याच्यावर विनामूल्य यशस्वी ह्दय शस्त्रक्रिया पार पाडली. अन वत्सलाबाई पाटील यांना नविन जीवनदान मिळाले.
विक्की खोकरे हे नेहमीच गोर गरीब रुग्णाच्या सेवेसाठी धावून जातात त्यानी आता पर्यंत हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहे. जळगाव जिल्ह्यात त्याना आरोग्य धूत म्हणून ओळखले जाते.वत्सलाबाई यांची तबीयत आता स्थिर असून ते ह्दय पिडीताने त्रासाने मुक्त झाले असून ते सुखरूप आपल्या घरी आले आहेत.